मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदूरबार दौऱ्यावर; ओझर विमानतळावर स्वागत | Uddhav thackeray

2021-03-19 430

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदूरबार दौऱ्यावर; ओझर विमानतळावर स्वागत
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदूरबार दौऱ्यावर असून (ता.१९) ओझर विमानतळावर त्यांचे सकाळी आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री महोदयांचे पुष्प देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री ठाकरे समवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास उपस्थित होते. तसेच यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी देखील मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांचे पुष्प देवून स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरने नंदुरबारकडे प्रयाण केले.

Videos similaires